सुकाणू समिती सदस्यांची माध्यमांसमोरच रंगली वादावादी

सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि जयंत पाटलांमध्ये चांगलचं नाट्य रंगलेलं दिसलं. 

Updated: Jun 10, 2017, 10:15 PM IST
सुकाणू समिती सदस्यांची माध्यमांसमोरच रंगली वादावादी

मुंबई : सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेमध्ये राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील आणि जयंत पाटलांमध्ये चांगलचं नाट्य रंगलेलं दिसलं. राजू शेट्टींच्या नेतृत्वावर रघुनाथदादांनी आक्षेप घेतला. माध्यमांसमोरच या नेत्यांमधली वादावादी रंगली. त्यामुळे यानंतर समितीचं नेतृत्व रघुनाथदादा करतील असं राजू शेट्टींनी जाहीर करुन टाकलं. 

हमीभआवाच्या मागणीवर सुकाणू समिती ठाम

शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याच्या आणि हमीभआवाच्या मागणीवर सुकाणू समिती ठाम आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु रात्याचप्रमाणे सरकारच्या निर्णयानंतर आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे समितीत कुठलेही मतभेद नसल्याचं यावेळी जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. 

तर  सरकारच्या निर्णयानंतर पुढची दिशा ठरवणार असल्याचा निर्णयही सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. दरम्यान, सरकारनं नेमलेल्या मंत्रिगटाशी सुकाणु समितीचे सदस्य उद्या चर्चा करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर उद्याची रणनिती ठरवण्याठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.