close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

श्रमलेल्या बापासाठी.... लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंचं ट्विट

नरेंद्र मोदी यांनीही 'बिटिया गिरनी चाहिए' असा संदेश दिला होता.

Updated: May 24, 2019, 10:15 AM IST
श्रमलेल्या बापासाठी.... लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंचं ट्विट

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या झंझावातापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवला. तर आपल्याला किमान १५ जागा मिळतील, असा दावा करणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले. एवढेच नव्हे तर शरद पवार यांचा नातू पार्थ पवार याचाही मावळ मतदारसंघातून दणदणीत पराभव झाला. त्यांचा हा पराभव पवार घराण्यासाठी मोठी नामुष्की मानला जात आहे. मात्र, दुसरीकडे शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखून आपल्या पक्षाची इभ्रत वाचवली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचे हे ट्विट सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये त्यांनी आपले वडील शरद पवार यांनी निवडणुकीसाठी घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा केली आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपकडून बारामतीची जागा जिंकण्यासाठीही संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये तळ ठोकून बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चंद्रकांत पाटील यांना बोलावून 'बिटिया गिरनी चाहिए' असा संदेश दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या मनात बारामतीमधील निकालाविषयी मोठी धाकधूक होती. 

देशात पुन्हा 'मोदीनामाचा' गजर; काँग्रेसची दैना

गुरुवारी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे पिछाडीवरही पडल्या होत्या. यादरम्यान पार्थ पवार यांच्या पराभवाची बातमी आल्याने आता बारामतीचा गडही पडणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, नंतरच्या सत्रात सुप्रिया सुळे यांनी पुन्हा आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. सुप्रिया यांनी भाजपच्या कांचन कूल यांचा १,५५,७७४ मतांनी पराभव केला.

पार्थच्या दारूण पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया