मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कार, बॉम्बस्कॉड घटनास्थळी

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कार आढळून आली आहे. मुकेश अंबानी यांची मुंबईतील अँटेलिया बिल्डिंगजवळ ही  कार उभी होती,

Updated: Feb 25, 2021, 08:10 PM IST
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस कार, बॉम्बस्कॉड घटनास्थळी

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कार आढळून आली आहे. मुकेश अंबानी यांची मुंबईतील अँटेलिया बिल्डिंगजवळ ही  कार उभी होती, या ठिकाणी पोलीस आणि बॉम्बस्कॉड पथक पोहोचलं आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. या गाडीत कोणतेही स्फोटकं आढळून आली आहेत, २५ जिलेटीनच्या कांड्या आढळल्याचं सांगण्यात येत आहे.

या ठिकाणांहून मंत्रालय, राजभवन याकडे जाणारे रस्ते असल्याने हे गंभीरतेने घेतलं जात आहे. या गाडीची तपासणी मागील काही मिनिटांपासून सुरु आहे, मात्र या गाडीत कोणतेही स्फोटकं आढळून आली असल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरापासून जवळच ही गाडी उभी असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. क्राईम ब्राँचकडे या घटनेचा तपास देण्यात आला आहे.