Sanjay Raut : 'मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे', संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut criticized on Shinde group : मुका घ्या मुका प्रकरणात, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी विचारला.

Updated: Mar 15, 2023, 11:31 AM IST
Sanjay Raut : 'मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे', संजय राऊत यांचा टोला title=

Sanjay Raut criticized on Shinde group : मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी मारला. आमदाराच्या मुलानेच हा व्हिडिओ काढला असा आरोप त्यांनी केला. मात्र, कारवाई ज्यांच्यावर करायला हवी, ते मोकाट आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का, असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.  (Thackeray group MP Sanjay Raut strongly criticized the Shinde group)

 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का?

मुका घ्या मुका प्रकरणात, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, पहिले गुन्हेगार सुर्वे आहेत, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आहे.

'फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना टार्गेट'

राज्यात खोके वाल्यांच्या संपत्तीचा हिशोब मागायला हवा पण ते आमच्या संपत्तीचा हिशोब मागत आहेत, असे राऊत यावेळी म्हणाले. ठाकरे परिवार, सहकारी यांचेबाबतीत खोटे गुन्हे दाखल करणे, संपत्तीचा विषय व्हिडिओ मॉंर्फिंगचा विषय,  फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना लक्ष करून राजकारण सुरु आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

 ठाकरे शक्तिशाली नेते

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शक्तिशाली नेते होते आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा समावेश 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये समावेश होणे हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने गौरव आहे, आदित्य एक मंत्री, नेता म्हणून जागतिक ठसा उमटवत आहेत, आदित्य हे एक राजकीय भविष्य आहे, असे ते म्हणाले.