नवाब मलिक यांचे 'ते' आरोप... काय म्हटलं हायकोर्टाने, वाचा

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत

Updated: Nov 22, 2021, 06:38 PM IST
नवाब मलिक यांचे 'ते' आरोप... काय म्हटलं हायकोर्टाने, वाचा title=

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब हे दररोज पत्रकार परिषदेत खोटेनाटे आरोप करत असल्यानं आपल्या कुटुंबाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप करत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्यावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. पण या सुनावणीत ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत, असं प्रथमदर्शनी वाटत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. 

तसंच नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास मुंबई हायकोर्टाने दिला नकार दिला आहे. 

पण याबरोबरच हायकोर्टाने नवाब मलिक यांनाही निर्देश दिले आहेत. यापुढे कोणतीही गोष्ट प्रसिद्ध करण्याआधी त्याची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे, वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे, बोलण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तसंच यापूर्वी केलेले ट्विट वैयक्तिक आकसापोटी केल्याचे दिसून येतायत, असेही कोर्टने निरीक्षण नोंदवले आहे.