महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत

Mumbai Police : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरवला आहे.  

Updated: Aug 4, 2022, 10:34 AM IST
महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत title=

मुंबई :  Mumbai Police : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्याकाळात निलंबित करण्यात आलेले तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना आता सेवेत सामावून घेतले आहे. (Mumbai Police Officer suspended in Maha Vikas Aghadi govt tenure restore in Police service)

माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह खंडणी प्रकरणात निलंबित डीसीपी पराग मनेरे यांना पुन्हा सेवेत घेतले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्याकाळात पराग मनेरे यांना निलंबित करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे पराग मनेरे यांना पुन्हा शासन सेवेत रुजू होत आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सेवेत आता दाखल होतील.

पराग मणेरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त होते. परमबीर सिंह खंडणीप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, शिंदे सरकार येताच गृहखात्याने पराग मनेरे यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. यावर आता महाविकास आघाडी काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता आहे.