चेंबूरमधील बीपीसीएल स्फोटातील जखमींची नावे

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे.  एकूण ४३ कामगार जखमी झालेत. 

Updated: Aug 8, 2018, 09:11 PM IST
चेंबूरमधील बीपीसीएल स्फोटातील जखमींची नावे title=

मुंबई : चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरले. हा स्फोट कसा झाला, हे पाहिले तर अंगावर काटा उभा राहतो. प्लांटमध्ये काम करणारे कामगार जखमी झालेत. एकूण ४३ कामगार जखमी झालेत. त्यापैकी २१ जणांवर उपचार करण्यात आले. तर आणखी जखमी कामगारांवर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, बीपीसीएल स्फोटानंतर भूकंप झाल्यासारखे धक्के जाणवल्याने बाजूच्याच माहुलगाव, गव्हाणपाडा आणि विष्णूनगर झोपडपट्टीतील लोक घाबरून घराबाहेर पडले. त्यानंतर लगेच धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उठल्याने लोक आणखीनच हादरले. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ झाला. या स्फोटाचे आवाज येताच भारत पेट्रोलिएमच्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केलेत. अडकलेल्या कामगार कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, ४३ कामगार जखमी झालेत. तर २१ कामगारांवर उपचार करण्यात आले आहेत.

जखमी कामगारांची नावे