मुंबईतल्या अपघातांच्या संख्येत २२ टक्क्यांची घट

 मुंबईत रस्ते अपघातांची संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष

Updated: Sep 27, 2019, 10:05 AM IST
मुंबईतल्या अपघातांच्या संख्येत २२ टक्क्यांची घट  title=

मुंबई : मुंबईत रस्ते अपघातांची संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष मुंबई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि ब्लूमबर्ग फिलनाथरोपीएसनं काढलाय. २०१५च्या तुलनेत मुंबईतल्या अपघातांच्या संख्येत २२ टक्क्यांची घट झाली आहे. असं असलं तरी २०१८मध्ये ४७५ मुंबईकरांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. संध्याकाळी ८ ते ९ यावेळेत सर्वात जास्त अपघात झाल्याचं समोर आले आहे. 

तर रविवारी सर्वाधिक म्हणजेच ५७३ अपघात घडल्याचे आकडे समोर आलेत. भीषण अपघातांना तरुणाई कारणीभूत असल्याच या अहवालात नमूद करण्यात आलंय. मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, सायन-ट्राम्बे रोड, नेताजी सुभाषचंद्र रोड आणि लिंक रोड या सात मार्गांवर हे अपघात झालेत. मुंबईतल्या अपघातांमध्ये घट झालीय ही समाधानाची बाब असली तरी यात आणखी घट होणं अपेक्षित असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.