मनसे, फेरीवाला संघर्ष पुन्हा रंगण्याची चिन्हे

मनसे आणि फेरीवाल्यांमधला संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. कृष्णकुंजवर मनसे कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली.

Updated: Jan 17, 2018, 08:57 PM IST
मनसे, फेरीवाला संघर्ष पुन्हा रंगण्याची चिन्हे title=

मुंबई : मनसे आणि फेरीवाल्यांमधला संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. कृष्णकुंजवर मनसे कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली.

या बैठकीत राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना हॉकर्स झोन आणि नियम याबाबतची प्रत दिली, त्याचा अभ्यास करून आपआपल्या विभागात हॉकर्स झोन बाबत हरकती सूचना नोंदविण्याचे आदेश दिलेत. मुंबईतल्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दादरमधल्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरच आता फेरीवाले ठाण मांडणार आहेत. या विषयावर बैठकीत चर्चा झाली.

फेरीवाला धोरणानुसार राज ठाकरेंच्या घरासमोरचा आणि मागचा अशा दोन्ही रस्त्यांवर हॉकर्स झोन तयार करण्यात आलाय. सध्या या दोन्ही रस्त्यावर एकही फेरीवाला बसत नसतांना येथे हॉकर्स झोन तयार करण्याची गरजच काय असा प्रश्न विचारला जातोय. तसंच या परिसरात शाळा असल्यानं हॉकर्स झोन तयार करण्याच्या नियमावलीचंही उल्लंघन करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.