मुंबई : पावसाने मुंबई आणि कोकणात कहर केला असला तरी राज्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस जुलै उजाडला तरी देखील झालेला नाही. याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरण्यांवर झाला आहे. 'झी मीडिया'चे सहकारी वृत्तपत्र 'डीएनए'ला मिळालेल्या एक्स्क्लुझिव्ह माहितीनुसार राज्यात आतापर्यंत फक्त ४.९१ 'टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही गंभीर आणि चिंतेची बाब समोर आलीय. राज्यात जवळपास १४९ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत फक्त ७.३५ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी जूनच्या अखेरीला जवळपास १८ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यात दुष्काळ पडल्याने हंगाम जवळपास वाया गेला.