मुकेश अंबानी आणि महाराष्ट्राची 'कायदा आणि सुव्यवस्था' यांना हादरवून टाकणारी घटना

रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हादरवून टाकणारी ही बातमी आहे.

Updated: Mar 5, 2021, 05:40 PM IST
मुकेश अंबानी आणि महाराष्ट्राची 'कायदा आणि सुव्यवस्था' यांना हादरवून टाकणारी घटना

मुंबई : रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हादरवून टाकणारी ही बातमी आहे. कारण काही दिवसापूर्वी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया बिल्डिंगसमोर, म्हणजे मुकेश अंबानींच्या घरासमोर जी बेवारस स्कार्पिओ आढळली होती, त्या स्कार्पिओ मालकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या मालकाची गाडी स्फोटकाने भरलेली स्कार्पिओ सापडण्याआधीच चोरीला गेली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यात एका खाडीत सापडला आहे.

स्फोटक प्रकरणातील गाडी मालकाची जर हत्या झाली असेल, तर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटक गाडीत सापडली, ती घटना अतिशय गंभीरतेने घेण्याची गरज आहे, हे या घटनाक्रमावरुन लक्षात येत आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर ही घटना येथेच थांबेल, असं वाटत असताना घटनाक्रम वाढत जात आहेत. दुसरीकडे हिरेन मनसुख यांची हत्या की आत्महत्या हे प्रश्न मात्र कायम आहेत. 

पोलिसांच्या तपासानंतर ही घटना समोर येणार आहे. पण मूकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ सापडली ही घटना मुकेश अंबानी आणि महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हादरवून टाकणारी आहे.