यंदा पितृपक्षात १ दिवस असणार कमी

पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करण्याचा पंधरवडा. आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींच निधन झालं आहे त्यांचे स्मरण करण्याचे हे दिवस. पण यंदा हा पंधरवडा फक्त १४ दिवसांचा असणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 4, 2017, 06:29 PM IST
यंदा पितृपक्षात १ दिवस असणार कमी  title=

मुंबई : पितृपक्ष म्हणजे पितरांना आवाहन करण्याचा पंधरवडा. आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींच निधन झालं आहे त्यांचे स्मरण करण्याचे हे दिवस. पण यंदा हा पंधरवडा फक्त १४ दिवसांचा असणार आहे. 

या दिवसांमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना आठवून अन्न किंवा जल दान केलं जातं. त्याचप्रमाणे अनेकजण आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या आवडीच्या पदार्थांचे किंवा वस्तूंचे दान करते. जेणे करून त्या व्यक्तीच्या आत्मास शांती मिळो. पितृपक्ष हा दिवस ५ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच यंदा पितृपक्ष सुरू होत आहे. पण हे श्राद्ध ६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. असं म्हटलं जातं की या पंधरवड्यात आपल्या गेलेल्या कुटुंबियांना आठवून कृतज्ञता व्यक्त करावी. अन्यथा संतान सुख मिळत नाही असं म्हणतात. 

यंदा चतुर्थी आणि पंचमी ही ९ सप्टेंबरला असल्यामुळे पितृपक्षाच्या पंधरवड्यात एक दिवस कमी येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, २०२० मध्ये पितृपक्ष १६ दिवसांच असणार आहे. यंदा १९ सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपणार असून २० सप्टेंबर रोजी देवांचे आणि इतर लोकांचे पितृपक्ष करून हा पंधरवडा संपणार आहे. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी देवीपक्ष सुरू होणार आहे. म्हणजे या दिवशी घटस्थापना देखील सुरू होणार आहे.