Video Mumbai : आता बोरीवली ते ठाणे प्रवास होणार सुखकर, नॅशनल पार्कमध्ये बांधणार सर्वात मोठा बोगदा

Longest Tunnel: मुंबईकरांसाठी प्रवास सुखकर म्हणजे लोकल शिवाय पर्याय नाही. मुंबईत रस्त्याने प्रवास करणे म्हणजे तासांतास गाडीमध्ये वेळ घालवणं. मुंबईकर वाहतूक कोंडीमुळे कायम त्रस्त असतात. पण ठाणे आणि बोरीवलीमधील लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Jan 6, 2023, 09:02 AM IST
Video Mumbai : आता बोरीवली ते ठाणे प्रवास होणार सुखकर, नॅशनल पार्कमध्ये बांधणार सर्वात मोठा बोगदा title=
Trending News borivali to thane Road Longest Tunnel mumbai news journey from Borivali to Thane will be smooth and will take less

Thane Borivali Road Tunnel : मुंबईकरांसाठी सगळ्यात जास्त वेळ जातो तो प्रवासामध्ये...मुंबईकरांसाठी मुंबई लोकल (Mumbai Local), मेट्रो (Metro) आणि आता मोनो (Mono) या त्यांचा सुखकर प्रवासाचा साथी...रस्त्याने प्रवास करायचा म्हटलं की आपण कधीही वेळ पोहोचणार नाही. अगदी दोन तीन तास या वाहतूक कोंडीत मुंबईकरांचा (Mumbaikar) जीव नकोसा होऊ जातो. या वाहतूक कोंडीमुळे (traffic jam) अनेकांची ट्रेन अगदी विमानही सुटलं आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने पुढाकार घेतला आहे. बोरिवली आणि ठाणेकरांसाठी (Thane Borivali News) आनंदाची बातमी आहे. 

बोरीवली ते ठाणे प्रवास होणार सुखकर

बोरीवली ते ठाणे (Mumbai to Thane) जाण्यासाठी साधारण दीड ते दोन तास एवढा कालावधी लागतो. पण आता हा प्रवास 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे खरं आहे. कारण एमएमआरमधील (MMR) अवजड वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकल्प हाता घेतले आहेत. एमएमआरडीएने (MMRDA) बोरीवली आणि ठाणेमधील अंतर कमी करण्यासाठी सर्वात मोठा लांबीचा बोगदा तयार करण्याचा मानस केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) हा सर्वात लांब भूमिगत बोगद्याच्या (Longest Tunnel) रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आली असून या प्रकल्पाचं काम पावसाळ्यात सुरु करण्यात येणार आहे. (Trending News borivali to thane Road Longest Tunnel mumbai news journey from Borivali to Thane will be smooth and will take less time)

सर्वात लांबीचा भुयारी मार्ग

मुंबईकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे,  मुंबईतील सर्वात लांबीचा बोगदा तयार होणार आहे. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून 11.8 किमी लांबीचा असून तो सुमारे 10.8 किमी लांबीचा दुहेरी बोगदा बांधण्यात येणार आहे. हा बोगदा जमिनीपासून साधारण 23 मीटर खाली असणार आहे. मुंबईकरांना या बोगद्यासाठी चार वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 

प्रकल्पाचा खर्च 

या प्रकल्पासाठी अंदाजे 13,200 कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचं सांगण्यात येतं आहे. या बोगद्याच्या रस्त्यावर सुरक्षा कॅमेरे, स्पीड कॅमेरे, स्मोक डिटेक्टर, वेंटिलेशन उपकरणे, अग्निशामक उपकरणे आणि ले-बे एरिया आदी अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. शिवाय या दोन्ही बोगद्यांमध्ये तीन पदरी रस्ता असणार आहे. 

प्रकल्पाची वैशिष्ट्यं 

मार्ग - बोरिवील ते ठाणे 

अंतर  - 24 किमी 

मार्गाची लांबी - 11.84 किमी

बोगद्याची लांबी - 10.8 किमी

जमिनीच्या खाली बोगद्याची खोली - 23 मीटर

खर्च - 13,200 कोटी रुपये

प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी - अंदाजे 4 वर्ष