ज्यांना वृद्धाश्रमात सुद्ध जागा नाही अशांना... उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यांरींची पात्रता काढली

ज्यांना वृद्धाश्रमात सुद्ध जागा नाही अशांना राज्यपाल बनवलं जातय का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.   

Updated: Nov 24, 2022, 05:27 PM IST
ज्यांना वृद्धाश्रमात सुद्ध जागा नाही अशांना... उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यांरींची पात्रता काढली title=

Uddhav Thackeray PC, मुंबई :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात मोठं वादंग उठलं आहे. यावरुनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर पत्रकार परिषदेत भगतसिंह कोश्यारी यांची पात्रता काढली. ज्यांना वृद्धाश्रमात सुद्ध जागा नाही अशांना राज्यपाल बनवलं जातय का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.   

महाराष्ट्राला हिंमत, अस्म्ता, स्वाभिमान, धमक काहीच नाही का? कोश्यारी यांनी छत्रपत्री शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.  महाराष्ट्राची अवहेलना होत आहे.  ज्यांच सरकार केंद्रात असतं त्यांचेच राज्यपाल विविध राज्यांमध्ये नेमलं जातात. मात्र, राज्यपालांची नियुक्ती करताना त्या माणसांची कुवत काय असते हे तपासले जात नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करणारी वक्तव्ये करत आहेत.  राज्यपाल महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. थेट छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. तरी देखील त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून महाराजांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. 

ज्या व्यक्तीची वृद्धाश्रमात राहण्याची देखील लायकी नाही अशा व्यक्तीला थेट राज्यपाल केल जायतं.  हे पार्सल जिथून आलयं तिथ परत पाठवावं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरुन हाकलपट्टी करण्याची मागणी केली आहे.