उद्धव ठाकरेंचा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना धक्का

शिवसैनिकांच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल

Updated: Jun 4, 2018, 07:32 PM IST
उद्धव ठाकरेंचा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना धक्का title=

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारीतून डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता कट केला आहे. डॉ. सावंत यांच्या ऐवजी विलास पोतनीस यांना संधी देण्यात आली आहे. दीपक सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे. विलास पोतनीस बोरीवलीचे विभागप्रमुख आहेत. तसेच लोकाधिकार समितीचे गेली अनेक वर्षे ज्येष्ठ पदाधिकारी देखील आहेत. डॉ. दीपक सावंत हे राज्यमंत्री मंडळात आरोग्यमंत्री आहेत. गेली 18 वर्ष ते विधानपरिषद आमदार आहेत.

डॉ. सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात नाराजी होती. वेळोवेळी बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याबाबत नाराजी व्यक्ती केली होती. डॉ. सावंत यांची मंत्री म्हणून कामाची छाप नाही, पक्ष संघटनेतही योगदान नाही. असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या नाराजीची दखल घेतली आहे.

पाहा बातमी सविस्तर