मुंबई : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला आहे. सोनू सूदची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सोनू सूदने सहा मजली इमारतीत बदल करून अनधिकृत हॉटेल (Unauthorized hotel) उभारण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत बीएमसीने कारवाईची नोटीस पाठवली होती. ऑक्टोबर महिन्यात ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर सोनू सूदने उच्च न्यायालयात (Mumbai High Court) या नोटिशीला आव्हान दिले होते. आज न्यायालयाने सोनू सूदही याचिका फेटाळून लावत सोनू सूदला मोठा दणका दिला आहे.
सोनू सुदला न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली pic.twitter.com/Abxzw2QmZN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 21, 2021
जुहू येथील रहिवासी इमारतीत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) नोटीस बजावली होती. या नोटीसीला आव्हान देणारी अभिनेता सोनू सूदने दाखल केली होती. अपील व अंतरिम याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोर्ट अपील आणि याचिका फेटाळून लावत आहे.
Bombay High Court dismisses actor Sonu Sood's petition challenging BMC notice on illegal construction at his residence https://t.co/NchYcpQmLW
— ANI (@ANI) January 21, 2021
पालिकेने बजावलेल्या नोटीसचे पालन करण्यासाठी सूदचे वकील अमोघसिंग यांनी दहा आठवड्यांचा अवधी मागितला आणि कोर्टाला इमारत पाडण्यासाठी पावले उचलू नयेत, असे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली. कोर्टाने ही विनंती मान्य करण्यास नकार दर्शविला आणि म्हटले की यापूर्वी अभिनेताकडे पुरेसा वेळ होता.