मुंबई : आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असलेल्या संशयित दहशतवाद्याला मुंबईत अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएसने मुंबईतून आयसिसच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव अबू जाहिद असं आहे.
अबू जाहिद हा उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील निवासी आहे. अबू जाहिद सोशल मीडियाच्या माध्यमातून आयसिस या दहशतवादी संघटनेत इतरांना भरती करण्याचं काम करत होता.
अबू जाहिद हा आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असून तो मुंबईत येणार असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने सापळा रचत अबू जाहिदला अटक केली.
We have brought the terror suspect on transit remand to Lucknow from Mumbai. He was the ideologue of his group: ADG (LO) Anand Kumar pic.twitter.com/JGA9XUYBG5
— ANI UP (@ANINewsUP) November 5, 2017
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू जाहिदला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्याला अटक करुन पोलिसांचे पथक लखनौला रवाना झालयं.
अबू जाहिद दुबईतून आयसिस या दहशतवादी संघटनेचं नेटवर्क चालवत होता. इतकेच नाही तर, अबू जाहिद हा बिजनौर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या इतर भागांतून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या थेट संपर्कात होता अशी ही माहिती समोर येत आहे.