पुण्यातही ओमायक्रॉमचा शिरकाव.... आजच्या बातम्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या

वाचा आतापर्यंतच्या घडामोडी आणि राहा अपडेट   

Updated: Dec 20, 2021, 08:46 AM IST
पुण्यातही ओमायक्रॉमचा शिरकाव.... आजच्या बातम्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या  title=

मुंबई : आजच्या महत्त्वाच्या  बातम्या .... जगातील 89 देशांमध्ये ओमायक्रॉमचा शिरकाव...  देशात ओमाक्रॉनचे 153 रुग्ण... मुंबईनंतर आता पुण्यातही ओमायक्रॉमचा शिरकाव आणखी काही महत्त्वाच्या बातम्या खालील प्रमाणे... 

1. जगातल्या 89 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट पोहोचला आहे. तीन दिवसांत रूग्णसंख्येत दुपटीने वाढ झालीय असा इशारा WHO ने दिलाय. कम्युनिटी ट्रान्समिशनची दाट शक्यता असलेल्या ठिकाणी अशा ठिकाणी ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टाच्या तुलनेत वेगानं पसरण्याची अधिक शक्यता आहे असं WHO ने म्हटलंय. 

2. देशभरात ओमाक्रॉनचे 153 रुग्ण आहेत. रविवारी देशात 10 ओमायक्रॉन बाधित आढळलेयत. त्यातले राज्यात 6 जण तर गुजरातमध्ये 4 जण आहेत. 11 राज्यात ओमायक्रॉन पसरलाय.

3. पुणे जिल्ह्यातील जुन्नर पाठोपाठ खेड तालुक्यात सुद्धा ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. ४४ वर्षाच्या नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा नागरिक दुबईवरून आला असून,तो मुंबई येथील विमानतळावर उतरल्यानंतर सर्दीचा ञास असल्याने तो सरळ दवाखान्यात दाखल झाला.

4. म्हाडा, टीईटीपाठोपाठ पोलीस भरतीही संशयाच्या भोव-यात...  डॉ. प्रीतिश देशमुखच्या घरात पोलीस भरतीची ओळखपत्रं सापडली आहेत... तर क्लास चालकांनी रेटकार्डच तयार केल्याचं उघड झालंय. 

5. महाराष्ट्रात थंडीची लाट...धुळ्यात तापमानाचा पारा 5.5 अंश सेल्सिअस वर... जळगाव,रायगड,पालघर,मुंबईच्या तापमानात घट...उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्य गारठला आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

6. मुंबईत ओमायक्रॉनची धास्ती असली तरी या काळात मुंबईत सर्वात कमी मृत्यूदर नोंदवला गेलाय. पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यूदर जून 2020 मध्ये 0.93 होता. तर दुस-या लाटेत सर्वाधिक मृत्यूदर मे 2021 मध्ये 0.91 इतका होता. मात्र सद्यस्थितीत नोव्हेंबर अखेर मुंबईत 0.35 इतका मत्यूदर आहे. 

7. मध्य रेल्वेवर सुरू असलेला मेगा ब्लॉक संपल्यानंतर स्लो लोकल अंशतः नव्यानं बांधलेल्या ट्रॅकवरून धावणार आहेत. 

8. मुंबई विमानतळावर कस्टमच्या अधिका-यांनी 3.8 किलो सोनं जप्त केलंय.. या सोन्याची बाजारातील किंमत 1.52 कोटी एवढी आहे.. चपला, केसांचे चाप आणि कॉफीच्या बाटल्यांमध्ये हे सोनं लपवून आणलं होतं. या प्रकरणी केनियातील महिलांच्या एका गटाला ताब्यात घेण्यात आलंय. या महिला शारजामधून मुंबईतआल्या होत्या

9. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जपानचा धुव्वा उडवून भारतीय संघ अग्रस्थानी पोहोचलाय. उपांत्य फेरीतील स्थान आधीच पक्के केलेल्या गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेमध्ये अखेरच्या साखळी सामन्यात जपानचा 6-0 असा धुव्वा उडवला...