१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित - राजेश टोपे

15 मेनंतर लॉकडाऊन वाढवणार का? यावर देखील चर्चा झाली. यासंबंधी सविस्तर माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

Updated: May 12, 2021, 07:32 PM IST
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित - राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोना वाढत असल्यामुळे  राज्य सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बौठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणासाठी तुर्त स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय 15 मेनंतर लॉकडाऊन वाढवणार का? यावर देखील चर्चा झाली. यासंबंधी सविस्तर माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

18 ते 44 वयोगटातील नारिकांच्या लसीकरणाबद्दल टोपे म्हणाले, '१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना तूर्त लस देणार नाही. ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळे त्यांना दुसरा डोस देणे गरजेचं असल्यानं खरेदी केलेली लस ही ४५ वरील लोकांना दिली जाणार. त्यामुळे सीरम जेव्हा लस देईल तेव्हा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जाईन.' 

राज्यातील रूग्णसंख्येबद्दल देखील टोपेंनी माहिती दिली, 'लॉकडाऊन केल्यानंतर रूग्णसंख्या 7 लाखांवरून ४लाख ७५ हजारांवर आली आहे. म्युकरमायकोसीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ' लॉकडाऊनबद्दल देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. 'लॉकडाऊन किमान १५ दिवस वाढवण्यावर चर्चा झाली.मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.'  असं देखील टोपे म्हणाले. 

' दुस-या डोससाठी २० लाख डोस हवेत. सध्या आपल्याकडे 10 लाख डोस आहेत. पहिल्या डोसची लगेच अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.