'शिवसेनेला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव' रवी राणा यांचा गंभीर आरोप

'मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न'

Updated: Jun 20, 2022, 01:19 PM IST
'शिवसेनेला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव' रवी राणा यांचा गंभीर आरोप title=

Vidhad Parishad Election : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी  विधानपरिषदेसाठी मतदान केलं आहे. रवी राणांविरोधात पोलिसांनी अटक वॉरंट काढलंय. अटकेच्या शक्यतेमुळे रवी राणा मतदानासाठी येणार की नाही, अशी चर्चा होती. पण रवी राणा मतदानासाठी पोहोचले. त्यांनी भाजपच्या विजयाचा दावा केलाय. 

रवी राणा यांचा आरोप
आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी अटक वॉरंट काढून आपल्या मुंबईतल्या घरी पोलीस पाठवले. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी त्यांना सहकार्य केलं. विधानपरिषद निवडणुकीत माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, मला थांबवण्यासाठी आणि शिवसेनेला मतदान झालं पाहिजे यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

संजय राऊत माझ्यावर बोलले की रवी राणा आमच्या पायाशी, पण एक लक्षात ठेवा जनतेने तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलं, पण 56 वर्षांनंतर पहिल्यांदा या जनतेला तुम्ही धोका दिला आहे. त्यामुळे जनताच तुम्हाला पायाशी घेईल हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर रवी राणा यांनी दिलं.

बजरंगबलीच्या कृपेने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीने भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला.