नवी दिल्ली : रामायण (Ramayan) ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय झाली होती. ही मालिका पाहताना साक्षात प्रभू रामचंद्र (Lord Ram) डोळ्यासमोर उभे राहतात. या मालिकेचा प्रेक्षकांवर इतका परिणाम झाली की मुस्लीम नागरीकही श्रीरामांचे भक्त झाले. याची प्रचिती आणणारा एक व्हिडिओ (Video) सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. एका मुस्लीम व्यक्तीला एअर पोर्टवर साक्षात प्रभू श्रीरामांचे दर्शन झाले. यानंतर मुस्लीम भक्ताची भगवान श्रीरामांप्रती असलेली भक्ती पाहून सगळ्यांनीच हात जोडले. हा व्हायरल व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकलेलं नाही.
अभिनेते अरुण गोवील (Arun Govil) यांनी प्रभू रामचंद्र यांचं पात्र इतकं सुरेख साकारलं आहे की मालिका पाहताना साक्षात प्रभू रामचंद्रच अवतरल्याचं वाटतं. यामुळेच केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम प्रेक्षक देखील या मालिकेचे चाहते झाले आहेत. अशाच एका मुस्लीम प्रेक्षकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दिल्ली विमानतळावरील हा व्हिडिओ सुखावणारा आहे.
अभिनेते अरुण गोवील यांना विमानतळावर पाहताच या भक्ताने थेट त्यांचे पाय धरले आणि त्यांचा आशिर्वाद घेतला. या भक्तासह त्याच्या कुटुंबातील सर्वांनीच अरुण गोवील यांच्यासह व्हिडिओ, सेल्फी आणि फोटो काढले. अरुण गोवील यांनी हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
जय सियारामजी की... प्रभू रामचंद्र यांच्या भक्तीने धर्माची बंधने देखील तोडली आहेत असं कॅप्शन अरुण गोवील यांनी हे याला दिले आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.