व्हायरल व्हिडिओ : वर्दीतील दर्दी कलाकार

व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ : वर्दीतील दर्दी कलाकार

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही? असाच एक गणपती विसर्जनातील व्हिजिओ व्हायरल झाला आहे. पण या व्हिडिओत एक खास गोष्ट आहे ती म्हणजे या व्हिडिओतील बाप्पाची मिरवणूक. या मिरवणूकीत बँजो वाजवण्यात आला आहे. मात्र यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या बँजोतील कॅशिओ वर्दीतील एक पोलीस वाजवत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

या व्हिडिओतील वर्दीतील पोलीस कॅशिओ वाजवत आहे. हा व्हिडिओ नक्की कुठचा आहे याबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही. पण बॅन्जोमधील व्यक्तीच्या टी शर्टवर 'टिटवाळा बिट्स' असं लिहिलं आहे. बहुदा हा व्हिडिओ टिटवाळ्यातील असावा. या बॅन्जोत पोलीस कॅशिओ वाजवत असल्यामुळे अनेक लोकं हा व्हिडिओ बनवत आहेत. हा व्हिडिओ खूप पसंतीला पडला आहे. 

आपण अनेकदा अनुभवलं आहे.. खाकी वर्दीतील तो माणूस खूप भावूक किंवा रसिक असल्याचं पाहिलं आहे. असाच हा व्हिडिओ... प्रत्येकाच्या सेवेसाठी चोवीस तास हजर असलेल्या पोलिसांना आपल्या आवडी निवडी जपता येत नाहीत. असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. गाण्याची आवड असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ या आधी व्हायरल झाला होता. प्रत्येक खाकी वर्दीमागील माणसाचं मन असं समोर आलं आहे. तसाच हा व्हिडिओ... 

आपण पाहिलं गणेशोत्सवाच्या अगोदर चिंतामणीच्या गणरायाचं आगमन होत असताना अनेक तरूणांनी हुल्लडबाजी करून नासधुस केली. यामध्ये पोलिसांचा पुतळा देखील तोडला. असं चित्र समोर असताना पोलिसांच हे रूप पाहायला मिळणं कठीण आहे.