भाविकांचा जड अंत:करणाने लालबागच्या राजाला निरोप

 हजारो भाविकांनी जड अंत: करणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.

Updated: Sep 24, 2018, 08:57 AM IST
भाविकांचा जड अंत:करणाने लालबागच्या राजाला निरोप

मुंबई : रविवारी सकाळी ११ वाजता चिवडा गल्लीतून निघालेली लालबागच्या राजाची मिरवणूक तब्बल १९ तासांनी गिरगाव चौपाटीला पोहोचली. सकाळी सहा वाजता राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात निघाली. हजारो भक्तांच्या साथीने पहाटे लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. हजारो भाविकांनी जड अंत: करणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.

कृत्रीम हौदात विसर्जन 

पुण्यात दगडूशेठ हलवाई गणेशाचं विसर्जन पहाटे साडेचार वाजता करण्यात आलं. दरवर्षीपेक्षा दोन अडीच तास आधीच दगडूशेठ आणि इतर गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. दगडूशेठसह बाबू गेनू मंडळ, अखिल मंडई मंडळ, भाऊ रंगारी गणेश या महत्त्वाच्या गणेशांचंही विसर्जन करण्यात आलं. कृत्रीम हौदात या गणेशांचं विसर्जन करण्यात आलं.