अहमदनगर : प्रत्येकामध्ये काही ना काही कलागुण असतात. ग्रामीण भागात (Rural India) देखील अनेक गुणवंत विद्यार्थी (Student) सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जगासमोर आले आहे. अशातच सध्या एका शाळकरी मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हायरल व्हीडिओत (Viral Video) हा विद्यार्थी प्रसिद्ध अशी 'चंद्रा' लावणी (Chandramukhi Lavani Dance) आपल्या मधूर आवाजात म्हणताना दिसतोय. हा व्हीडिओ कृष्णा राठोड यांनी (Krushna Rathod) फेसबूकवर शेअर केलाय. (viral video school student chandramukhi lavani sing song teacher krushna rathod share video on facebook)
जयेश खरे या विद्यार्थ्यांने प्रसिद्ध चंद्रा ही लावणी आपल्या सुरेख आवाजात गायली आहे. जयेश हा विद्यार्थी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील करजगावच्या विद्यालयात शिकतो. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या जयेशच्या कलागुणांचा हा व्हीडीओ त्याचे शिक्षक कृष्णा राठोड यांनी समोर आणला. व्हायरल झालेल्या या व्हीडीओमधून कौशल्य, आवाजात गोडवा आणि अप्रतिम चढउतारचं कौशल्य दिसून येतंय.
हा व्हीडिओ नेटकऱ्यांनी डोक्यावर धरुन उचललाय. इतकंच नाही, तर थेट हा व्हीडिओ पाहून चंद्रा या लावणीवर थिरकलेल्या अमृता खानविकरलाही हा व्हीडिओ आवडलाय. तिने या फेसबूकवर पोस्टवर "Kaaaamaaaallll" अशा शब्दात प्रतिक्रिया देत कौतुक केलंय.
कृष्णा राठोड हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांची करजगावमध्ये बदली झाली. त्यानिमित्ताने ते बदली झालेल्या करजगावमध्ये गेले. या दरम्यान ते इयत्ता सहावीच्या वर्गावर गेले. तिथे त्यांना हा हरहुन्नरी जयेश सापडला. विद्यार्थ्यांचं आणि शिक्षक म्हणून गेलेल्या कृष्णा राठोड यांचा परिचय झाला. त्यानंतर कृष्णा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यात असलेले गुण हेरण्यास सुरुवात केली. या दरम्यान कृष्णा यांना जयेशमध्ये दडलेला कलाकार सापडला. याबद्दलचा सर्व अनुभव कृष्णा यांनी फेसबूकवर शेअर केला.
"श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गावर गेलो. विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणं सादर केले..गाणं ऐकल्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे", असं कृष्णा राठोड यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय.