शुभमंगल सावधान होण्याआधी 'पहिली बायको' मंडपात आली अन् राडाच राडा...

वसईतल्या एका लग्न समारंभात चित्रपटाला शोभेल असा प्रकार घडलेला पाहायला मिळाला. पतीच्या सुरू असलेल्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीने धाड घालून राडा घेतला व अंतिम टप्प्यात सुरू असलेले लग्न मोडले.

Updated: Dec 14, 2021, 02:58 PM IST
शुभमंगल सावधान होण्याआधी 'पहिली बायको' मंडपात आली अन् राडाच राडा... title=

प्रथमेश तावडे,झी मीडिया,वसई : वसईतल्या एका लग्न समारंभात चित्रपटाला शोभेल असा प्रकार घडलेला पाहायला मिळाला. पतीच्या सुरू असलेल्या दुसऱ्या लग्नात पहिल्या पत्नीने धाड घालून राडा घेतला व अंतिम टप्प्यात सुरू असलेले लग्न मोडले.

वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉलमध्ये हा प्रकार घडला. अर्जुन सिंग ठाकूर असं पतीचे नाव असून कांचन सिंग ठाकूर असे पत्नीचे नाव आहे.

2012 मध्ये दोघांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला होता, पतीने हवा तो हुंडाही घेतला होता, मात्र सहा महिन्यातच त्याने पतीने पत्नीला दूर केले, या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे.

घटस्फोट न होताच काल रविवारी पती दुसऱ्या लग्न करत असल्याचे पहिल्या पत्नीला समजले व तिने भर लग्न मंडपात येऊन राडा घातला.

या राड्यामुळे लग्न समारंभात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला व दुसरे लग्न होता होता थांबले.

सुमारे दोन तास सुरू असलेल्या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्ती करत वातावरण शांत केले.पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित पत्नीने केली आहे.