close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कुटुंब म्हणून राज ठाकरे यांच्या पाठिशी - संजय राऊत

संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Updated: Aug 22, 2019, 12:27 PM IST
कुटुंब म्हणून राज ठाकरे यांच्या पाठिशी - संजय राऊत

मुंबई : कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु झाली आहे. राज ठाकरेंना ईडीकडून आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ते कृष्णकुंज निवासस्थानातून ईडी कार्यालयाकडे निघाले. राज ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत. संकटात आम्ही एकत्र उभे असतो. हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

याआधी काल उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं की, 'मला नाही वाटत की या चौकशीतून काहीही बाहेर येईल.'

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे संकाटाच्या काळात नेहमी एकमेकांसोबत उभे राहतांना याआधी देखील दिसले आहेत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसताना राज ठाकरे हे थेट रुग्णालयात गेले होते आणि स्वत: गाडी चालवत त्यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. अनेक वेळा वेगवेगळ्या प्रसंगी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.

राज ठाकरे यांच्यांसोबत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे ही उपस्थित आहेत. राज ठाकरे यांना एकट्याला ईडी ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर ईडीच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.