मुंबईकरांनो, 'या' वस्तू तुमच्या हातात दिसल्या तर होणार पोलीस कारवाई!

Weapon ban In Mumbai: शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाढी वापरली जाणारी हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Updated: Jan 10, 2024, 02:08 PM IST
मुंबईकरांनो, 'या' वस्तू तुमच्या हातात दिसल्या तर होणार पोलीस कारवाई!  title=

Weapon ban In Mumbai: मराठा आरक्षण मुद्द्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना 'चलो मुंबई'ची हाक दिली आहे. यामुळे राज्यभरातील मराठा समाज मोठ्या प्रमाणत मुंबईच्या रस्त्यांवर उतरलेला दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा, सुव्यवस्था राहावी म्हणून मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांकडून हत्यार बंदीचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार पुढे देण्यात आलेल्या वस्तू ज्यांच्या हातात दिसतील त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाढी वापरली जाणारी हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई होईल. यामध्ये शरखे, अग्निशखे, बॅटन, तलवारी, भाले, दंडूके, सोटे, बिना परवाना बंदुका, चाकू, फाड्या किंवा लाठ्‌या या वस्तूंचा समावेश आहे. परवाना असलेल्यांनाच बंदुका वापरण्याचे अधिकार असणार आहेत.

कोणताही संक्षारक पदार्थ किंवा स्फोटके वाहून नेणे,  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा उपकरणे किंवा क्षेपणास्त्रे टाकण्याची किवा प्रक्षेपित करण्याची साधने, वाहून नेणे, गोळा करणे आणि तयार करणे.व्यक्ती किंवा प्रेत किंवा आकृती किंवा पुतळे यांचे प्रदर्शन, सार्वजनिक टिकाकरण उच्चार, गाणी गाणे, संगीत वाजवणे यावर बंदी असणार आहे. 

सामाजिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकणेस कारणीभूत ठरू शकेल असे कृत्य करणे, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारी चित्रे, चिन्हे, फलक किंवा  वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

प्रतिबंधाचे उल्लंघन करुन उपरोधक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्व घेऊन जाणारी व्यक्ती कोणत्याही पोलीस अधिकामार्फत निशस्त्र होण्यास जबाबदार असेल. त्याच्याकडून संक्षारक पदार्थ किंवा स्फोटक किंवा क्षेपणास्त्र जप्त करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या वस्तू, उपरोधिक पदार्थ, स्फोटक किंवा शेपणारव राज्य सरकारकडे जमा करण्यात येणार आहेत. 

खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार यांना हा आदेश लागू नसेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दिलेल्या आदेशाचा कालावधी संपला तरी  कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते, चालू ठेवली जाऊ शकतेय आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेल्या कोणत्याही दंड, जप्ती किंवा शिक्षा लागू केल्या जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनद्वारे मुंबई पोलिसांकडून याबद्दलची माहिती जनतेत पोहोचवली जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी हत्यार बंदी करण्यात आली आहे
मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. मनोज सारंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळेस हिंसक वळण बीडमध्ये पाहायला मिळाला होता. यासाठीच पोलिसांच्या वतीने हा आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 11 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे आदेश लागू असतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.