मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यामधली बैठक संपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये यायची ऑफर दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ऑफरबद्दल आपण दोन दिवसांमध्ये कळवणार असल्याचं राणेंनी सांगितलं आहे.
मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबतच्या राजकीय चर्चा मी आज जाहीर करणार नाही, असं राणे म्हणाले आहेत. शिवसेना फक्त धमक्या देते, ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असा टोलाही राणेंनी लगावला आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राणेंना दिलेल्या ऑफरमुळे शिवसेनेनं कोणतीच प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली आहे. राणेंबाबत अंतिम निर्णय जाहीर झाल्यावर शिवसेना भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.