...मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे? - खडसे

वंदे मातरमवरून विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर प्रचंड गोंधळ झाला. अबू आझमींना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्हारे देश में चले जाव, असं भाजप आमदार अनिल गोटेंनी सुनावलं. त्यावर उत्तर देताना अबू आझमींनी देशप्रेमाचे अनेक दाखले दिले..

Updated: Jul 28, 2017, 02:34 PM IST
...मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे? - खडसे title=

मुंबई : वंदे मातरमवरून विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर प्रचंड गोंधळ झाला. अबू आझमींना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्हारे देश में चले जाव, असं भाजप आमदार अनिल गोटेंनी सुनावलं. त्यावर उत्तर देताना अबू आझमींनी देशप्रेमाचे अनेक दाखले दिले..

खडसे यांनी अबू आझमींना हिंदीतूनच उत्तर दिलं. जर तुम्ही याच मातीत जन्मलात, याच मातीत दफन व्हाल, मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे, असा सवाल खडसेंनी केला. याच मुद्द्यावरुन बाहेर एमआयएम आमदार वारीस पठाण आणि राज पुरोहितांमध्येही जोरदार जुंपली.

या सगळ्या वादात काँग्रेस आमदार अस्लम शेख मात्र खडसेंशी सहमत होते. मी समर्थन करतो, असं काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत म्हंटलं.