आता रेल्वेतही लवकरच वाय-फायची सुविधा- रेल्वेमंत्री

रेल्वेने रेल्वे स्टेशन्सवर वायफायची सुविधा दिलेली आहे, यानंतर रेल्वे वाय-फाय सुविधा रेल्वेगाडीत देखील देणार आहे.

Updated: Oct 23, 2019, 02:40 PM IST
आता रेल्वेतही लवकरच वाय-फायची सुविधा- रेल्वेमंत्री title=

मुंबई : रेल्वेने रेल्वे स्टेशन्सवर वायफायची सुविधा दिलेली आहे, यानंतर रेल्वे वाय-फाय सुविधा रेल्वेगाडीत देखील देणार आहे. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ वर्षात भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा दिली जाणार आहे. अर्थातच यासाठी रेल्वेला इंफ्रामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

सध्या देशात ५ हजारापेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेला देखील अपेक्षा आहे की, चालत्या गाडीत वायफायची सुविधा दिली. तर प्रवासी संख्येत वाढ होईल. 

तसेच वायफायच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रिअल टायमिंग मॉनेरटिंगमध्ये मदत होणार आहे. रिअल टाईम मॉनेटरिंगमुळे गुन्हे कमी होण्यास आणि गुन्ह्याची उकल होण्यास मदत होणार आहे.