सेल्फीसाठी राज ठाकरेंना महिलांनी घेरलं, राज ठाकरेंनी दिली अशी पोज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. मात्र, सभा सुरु होण्यापूर्वी एक वेगळचं चित्र स्टेजवर पहायला मिळालं.

Updated: Apr 15, 2018, 09:19 PM IST
सेल्फीसाठी राज ठाकरेंना महिलांनी घेरलं, राज ठाकरेंनी दिली अशी पोज title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. मात्र, सभा सुरु होण्यापूर्वी एक वेगळचं चित्र स्टेजवर पहायला मिळालं.

मुलुंड परिसरात राज ठाकरे यांच्या हस्ते १०० महिलांना रिक्षा वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्टेजवर दाखल झाले आणि त्यानी या महिलांवर स्टेजवर बोलावलं.

स्टेजवर महिला आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना घेरलं आणि चक्क सेल्फी काढत असल्याचं चित्र पहायला मिळालं. या सभेत कोकणातील नाणार प्रकल्प, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच कठुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या घटनांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं. 

दरम्यान, राज ठाकरे १ मेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांची पहिली सभा पालघर येथे होणार आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

  • येत्या काही काळात महाराष्ट्राचे वाळवंट होईल: राज ठाकरे
  • मराठी माणसाच्या हितासाठी हा राज ठाकरे कोणताही त्रास सहन करायला तयार आहे - राज ठाकरे
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात - राज ठाकरे
  • काही झाले तरी, कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही. सरकारला काय करायचे ते करू देत - राज ठाकरे
  • निर्भया प्रकरणी मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवणाऱ्या स्मृती इराणी आता गप्प का - राज ठाकरे
  • गुजरात विधानसभेची निवडणूक संपताच राहुल गांधी यांना पप्पू बोलणारे एकदम गप्प झाले - राज ठाकरे