मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडा लॉटरीचा मुहूर्त ठरला

जाणून घ्या कधी जाहिर होणार लॉटरी  

Updated: Aug 23, 2022, 07:39 AM IST
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडा लॉटरीचा मुहूर्त ठरला  title=

मुंबई : मुंबईत स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण एवढ्या महागाईच्या भडक्यात आणि घरांचे गगनाला भिडलेले दर पाहाता  सर्व सामान्यांनासाठी म्हाडा लॉटरी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील मुंबईत घर घेण्याच्या  प्रतीक्षेत आहात, तर तयारी सुरू करा. कारण दिवाळीत म्हाडा चार हजार घरांची सोडत काढणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. 

म्हाडाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबकईकरांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. 2019 नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही

मुंबई मंडळाकडे पुरेशी घरं नाहीत आणि काम सुरू असलेली घरं सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे सोडत रखडली आहे. 

पण आता ही सोडत मार्गी लावण्यात येईल. सोडतीत पहाडी, गोरेगाव इथली 3015 घरं आहेत, तसंच कोळे कल्याण, ऍन्टॉप हील, विक्रोळी इथल्या घरांचाही समावेश आहे.