Finger in Ice Creme: आइस्क्रीममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढळला आहे. मालाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मालाडमध्ये एका डॉक्टरांनी ऑनलाईन डिलेव्हरी अॅपमधून घरी आईस्क्रिम मागवलं. मात्र आईस्क्रिमचा पॅक फोडल्यानंतर त्यांना त्यामध्ये चक्क २ इंच लांबीचा मानवाच्या बोटाचा तुकडा आढळून आला होता. या घटनेने परिसरात आता एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या आईस्क्रिमच्या कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.
आइस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळून आल्यानंतर ब्रेंडन फेराओ यांनी इन्स्टाग्रामवर यम्मो कंपनीला टॅग करत पोस्ट शेअर केली. इतकंच नव्हे तर त्यांनी मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आईस्क्रिम तयार करणा-या कंपनीची चौकशी सुरु केली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी बोटाचा तुकटा प्रयोगशाळेत पाठवला आहे. पोलिसांनी यम्मो कंपनीवर गुन्हा केली आहे. 272, 273आणि 336 आयपीसी अंतर्गत गुन्हा रजिस्टर्ड केला आहे पुढील तपास चालू आहे
या सर्व प्रकरणावर आता यम्मो कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.आम्ही ही घटना अतिशय गांभीर्याने घेत संबंधित युनिटचं थर्ड पार्टी उत्पादन थांबवलेलं आहे. त्या थर्ड पार्टी कंपनीने केलेली संबंधित आणि इतर उत्पादनेही बाहेर काढण्यात आली आहेत. त्या कंपनीतील उत्पादने बाजारातूनही हटवण्याचे काम सुरू आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. आमची कंपनी कायद्याचे पालन करणारी आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू, असं कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्राधिकरणाने (एफडीए) या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, फेराओ यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, मला आइस्क्रीममध्ये बोट सापडल्यानंतर मी लगेचच ते बर्फात ठेवून दिले. त्यानंतर आइस्क्रीमच्या रॅपरसह मलाड पोलिस ठाण्यात पोहोचला. आइस्क्रीमच्या रॅपरवर मॅन्युफॅक्टर डेट 11 मे 2024 आणि एक्सपायरी डेट 10 मे 2025 लिहली होती. तर, हे आइस्क्रीम गाझियाबादच्या लक्ष्मी आइस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेडकडून बनवण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिथे या आइस्क्रीमचे उत्पादन केले होते त्या फॅक्ट्रीमध्ये तपास करण्यात येत आहे. त्यानंतर आइस्क्रीममध्ये बोट कसे आले याचा उलगडा होणार आहे. पोलिसांनी गाझियाबादची फॅक्ट्री सील केली आहे. येथेल आइस्क्रीम पॅक करण्यात आले होते. तिथे गेल्यानंतरच पुढील तपास करण्यात येणार आहे.