close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी - वरुण सरदेसाईंची मागणी

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का याबाबत उत्सूकता

Updated: May 27, 2019, 03:16 PM IST
आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी - वरुण सरदेसाईंची मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यावर आता शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम रहाणार असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी युवासेना आक्रमक झाली आहे. आता तर थेट युवासेनेनं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीच विधानसभा निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे.

इंस्टाग्रामवर युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी तशी मागणीच केली आहे. त्यांच्या या आग्रही मागणीला आदित्य ठाकरे कधी होकार देतात की नकार हे आता पहावं लागेल. आदित्य ठाकरे यांनी निवडणुक लढवली तर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कुणी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य निर्माण होईल यात शंका नाही.