'झी मराठी दिशा' गणेशोत्सव विशेषांक 'सुखकर्ता'चे प्रकाशन

गणेशोत्सव विशेषांक 'सुखकर्ता'चे प्रकाशन

Updated: Aug 28, 2019, 07:21 PM IST
'झी मराठी दिशा' गणेशोत्सव विशेषांक 'सुखकर्ता'चे प्रकाशन title=

मुंबई : झी मराठी दिशा या आठवडापत्राचा गणेशोत्सव विशेषांक 'सुखकर्ता' याचे प्रकाशन श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, अभिनेत्री श्रेया बुगडे, सिद्धिविनाय मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्ष सुमंत घैसास, झी मराठी दिशा आणि झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

सुखकर्ता या विशेषांकात यंदा 'माझी गणेशभक्ती' या सदराखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय नेते, कलाकार यांनी आपले मनोगत शब्दबद्ध केलं आहे. त्याचप्रमाणे प्राचीन गणेश मूर्ती, आरतीचे महत्व, स्ञी रुपातला गणपती अशा अनेक पैलूंवर भाष्य करणारा सुखकर्ता हा अंक झी मराठी दिशाकडून वाचकांच्या भेटीला आला आहे. 

झी मराठी दिशाच्या या अंकाच्या नोंदणीसाठी संपर्क क्रमांक आहे ९०२९००१३९३. या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही या अंकासाठी नोंदणी करू शकता. सुखकर्ता या विशेषांकाची किंमत १०० रुपये आहे.