किंग खानच्या हस्ते 'इफ्फी'चे उद्घाटन

गोव्यात भरणाऱया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन २३ नोव्हेंबरला मडगाव येथे बॉलिवूड सुपरस्टार किंग खान याच्या हस्ते होणार आहे

Updated: Nov 21, 2011, 07:27 AM IST


झी २४ तास वेब टीम, पणजी

 

गोव्यात भरणाऱया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन २३ नोव्हेंबरला मडगाव येथे बॉलिवूड सुपरस्टार किंग खान याच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाची तयारी  अंतिम टप्प्यात आली आहे.

 

'इफ्फी'मध्ये चित्रपटांची रेलचेल असल्याने रसिकांना त्याचा आस्वाद घेता येणार आहे. शाहरूख खान याच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने जोरदार तयारी करण्यात येत आहे.  गोवा सिनेफिल क्‍लबच्या सदस्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळमजल्यावर हे दालन तयार करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी या दालनात क्‍लबचे सदस्य चर्चा करू शकणार आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींचे दालन हे पत्रकार कक्षाच्या बाजूलाच सुरू करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, २२ नोव्हेंबरपासून प्रतिनिधींना महोत्सवाची पूर्ण माहिती देणाऱ्या सामग्रीचे वाटप करण्यात येणार आहे. माकिनेज पॅलेस इमारतीच्या तळमजल्यावर ही व्यवस्था करण्यात आली आहे. सिनेफील क्‍लबच्या सदस्यांनी आपली इफ्फीची ओळखपत्रे तेथूनच घ्यावीत, असे गोवा मनोरंजन संस्थेने  केले आहे.