'टायगर' पाकिस्तानात रिलीज होणार?

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘एक था टायगर’ पाकिस्तानत रिलीज होईल, असा विश्वास वाटतोय निर्माता कबीर खानला.

Updated: Aug 6, 2012, 04:04 PM IST

www.24taas.com, मुंबई 

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘एक था टायगर’ पाकिस्तानत रिलीज होईल, असा विश्वास वाटतोय निर्माता कबीर खानला.

 

‘काबूल एक्सप्रेस’ला समीक्षकांनी उचलून धरल्यानंतर कबीर खान आता सज्ज झालाय ‘एक था टायगर’ या बहुचर्चित सिनेमासाठी. या सिनेमातली जोडी सलमान खान आणि कतरिना कैफ यांचाही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी चांगलाच फायदा होतोय. यश राज फिल्मच्या बॅनरखाली सलमान खानचा हा पहिलाच चित्रपट आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सलमान खान बराच बिझी आहे. देशात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो भेटी देतोय. यासाठीच सलमान पाकिस्तान भेटीसाठीही उत्सुक आहे.

 

‘एक था टायगर’चे प्रोमोज टीव्हीवर दाखवू नयेत, असा आदेश पाकिस्तानी सरकराने देशभरातल्या केबल ऑपरेटर्सना दिल्यानं त्याचा फटका चित्रपटाला बसणार हे तर नक्कीच... पण कबीर खान मात्र हा चित्रपट पाकिस्तानातही प्रदर्शित होणार याबद्दल पूर्ण खात्री आहे. सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला हिरवा कंदील मिळणारच याबद्दल तो अजिबात साशंक नाही. पाकिस्तानातल्या काही मल्टिप्लेक्सनंदेखील सलमान खानचा हा सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी दर्शविली आहे.

 

सलमान खान हा पाकिस्तानातही खूप लोकप्रिय अभिनेता आहे तसंच हा सिनेमा ईदच्या मुहूर्तालाच रिलीज होणार आहे. पाकिस्तानातील काही मल्टिप्लेक्सनंही एक था टायगरसाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणं ही बाब केवळ माझ्यासाठी, सलमानसाठी किंवा यश राज फिल्मसाठी महत्त्वाची राहिलेली नाही, तर पाकिस्तान सरकारसाठी ही गोष्ट आता तितकीच महत्त्वाची असणार आहे, असं कबीरनं म्हटलंय. सोबतच या सिनेमात कोणतीही आक्षेपार्ह दृश्यं किंवा डॉयलॉग्स् नसल्यानं पाकिस्तान सरकारकडूनही या सिनेमाला हिरवा झेंडा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे, असंही कबीर म्हणतोय.

 

.