दिलदार किंग खान

शाहरुख खान आपल्या दिलदारीसाठी प्रसिध्द आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींनी सढळहस्ताने भेटी देण्याबाबतीत शाहरुख खानच्या हात कोणी धरु शकत नाही. रा-वनच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांना शाहरुखने नव्या कोऱ्या कार भेट देण्याचं ठरवलं आहे. आणि त्यासाठीच शाहरुखने पाच नव्या बीएमडबल्यु ७ सिरीज कार बुक केल्या आहेत.

Updated: Nov 12, 2011, 11:35 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

शाहरुख खान आपल्या दिलदारीसाठी प्रसिध्द आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींनी सढळहस्ताने भेटी देण्याबाबतीत शाहरुख खानच्या हात कोणी धरु शकत नाही. रा-वनच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांना शाहरुखने नव्या कोऱ्या कार भेट देण्याचं ठरवलं आहे. आणि त्यासाठीच शाहरुखने पाच नव्या बीएमडबल्यु ७ सिरीज कार बुक केल्या आहेत.

 

अर्जून रामपाल, दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि सुपरस्टार रजनीकांत यांना बीएमडबल्यु ७ सिरीज या महागड्या कार भेट देण्यात येणार आहेत. रजनीकांत आजारी असताना देखील रा-वनमध्ये छोटी भूमिका करण्यासाठी खास चेन्नईहून मुंबईत दाखल झाला होता. या व्यतिरिक्त अजून दोघांना या गाड्या भेट म्हणून देण्यात येणार आहेत पण त्यांची नावे कळू शकलेली नाहीत. याआधीही मै हूँ ना चे दिग्दर्शन करणाऱ्या फराह खानला शाहरुख खानने ह्युंदाई टेराकॅन भेट दिली होती. ओम शांती ओमच्या वेळेस तर फराहला शाहरुख खानने मरसिडीज दिली होती.

 

पण अनुभव सिन्हाला बीएमडबल्यु पेक्षा सेलफोनची अधिक गरज आहे. अनुभव सिन्हाचा फोन लॉ एजेलिसला जाताना हरवला. आणि ज्या माणसाच्या हाताला तो लागला आहे तो आपणच अनुभव सिन्हा असल्याचे भासवून सर्वांशी गप्पा मारत सुटला आहे. या माणसाने तर शाहरुखशी गप्पा मारल्यामुळे अनुभव सिन्हाला त्याच्या उपदव्यापांची भीती वाटू लागली आहे. सेलफोन तर हरवलाच आणि त्यात हा आणखी डोक्याला वाढलेला ताप हा ‘अनुभव’ अनुभव सुध्दा आयुष्यभर विसरु शकणार नाही.