फक्त 'एका रूपयासाठी' सलमानची 'दादा'गिरी

सलमान खानची दबंगगिरी बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. आणि आता पुन्हा एकदा सलमानने शाहरुख खानला टार्गेट केलं आहे. सलमान आणि शाहरुख खान यांच्यामधलं स्टारवॉर संपण्याऐवजी वाढतच चाललं आहे.

Updated: Mar 14, 2012, 11:59 AM IST

www.24taas.com

 

सलमान खानची दबंगगिरी बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. आणि आता पुन्हा एकदा सलमानने शाहरुख खानला टार्गेट केलं आहे. सलमान आणि शाहरुख खान यांच्यामधलं स्टारवॉर संपण्याऐवजी वाढतच चाललं आहे. सलमान आणि शाहरुख एकमेकांवर मात करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आणि अशीच संधी सध्या सलमानने साधली आहे कारण सलमान यशराज बॅनरच्या आगामी सिनेमामध्ये काम करतो आहे. आणि या सिनेमामध्ये काम कऱण्यासाठी सलमानने एकच अट ठेवली आहे. आणि ती म्हणजे यश चोप्रा यांनी आगामी सिनेमासाठी शाहरुखला जेवढी रक्कम दिली आहे त्यापेक्षा एक रुपयाने अधिक किंमत आपल्याला देण्यात यावी.

 

सलमानची ही अट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसंच सलमानने या सिनेमाच्या PROFIT SHARE मध्येही आपला वाटा मागितला आहे. मात्र सलमानची ही लिस्ट इथेच थांबत नाहीए. तर धूम-३ सिनेमासाठी यशराज बॅनरने आमीरला किती पैसे दिले आहेत याचीदेखील चौकशी सलमानने केली होती. सलमान आणि आमीर यांच्यामध्ये कितीही मैत्री असली तरी आमीरपेक्षा आपल्यालाच अधिक मानधन मिळावं असं सलमानला मनोमनी वाटत आहे.

 

तसं पाहिलं तर मानधन हा बॉलिवूडसाठी नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेक स्टार्समध्ये मानधनावरून जुंपली आहे. मात्र काही लेजंट असेही इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळले आहेत ज्यांनी स्वत: हून आपलं मानधन कमी केलं होतं आणि यापैकी एक म्हणजे किशोर कुमार. किशोर कुमार यांना एका गाण्यासाठी १५००० रुपये मिळायचे मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरापोटी किशोर कुमार यांनी लता दिदींपेक्षा एक रुपया कमी मानधन घेतलं होतं. मात्र सध्या इंडस्ट्रीमध्ये सगळीच गणितं बदलली आहेत.

 

स्टार्स एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नेहमीच तयार असतात. आणि सध्या सलमान त्याच वाटेवरून जातो आहे. सलमानच्या फिल्मस सध्या बॉक्सऑफिसवर हिट ठरत आहेत. त्यामुळे मानधनाच्या बाबतीत सलमान अशी डिमांड करतो आहे हे उघडच आहे. मात्र शाहरुख-सलमान आणि आमीरचं स्टारडम पाहता यशराज बॅनरने या तिघांना जवळपास १५ कोटी रुपयांचं मानधन ठरवलं होतं. मात्र आता सलमानच्या या हट्टापायी यशराज बॅनर खरोखरच सलमानला शाहरुखपेक्षा एक रुपया अधिक मानधन देतं का आणि शाहरुख याला कसं उत्तर देतो हे पाहणं इंटरेस्ट्रींग ठरणार आहे.