रजनीकांत यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

शिवाजीराव गायकवाड म्हणजेच रजनीकांत यांचा आज वाढदिवस. रजनीकांत अवघ्या पाच वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झालं. रजनीकांतने कन्नड माध्यमातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतरच्या संघर्षाच्या काळात त्याने काही काळ हमाल म्हणून सुध्दा काम केलं.

Updated: Dec 11, 2011, 06:58 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

शिवाजीराव गायकवाड म्हणजेच रजनीकांत यांचा आज वाढदिवस. रजनीकांत अवघ्या पाच वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झालं. रजनीकांतने कन्नड माध्यमातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतरच्या संघर्षाच्या काळात त्याने काही काळ हमाल म्हणून सुध्दा काम केलं. रजनीकांतने बस कंडक्टर म्हणून काम करत असताना नाटकाची आवड जोपासली. रजनीकांतचा सहकारी राज बहादूरने त्याच्यात असलेली गुणवत्ता ओळखली आणि मद्रास फिल्म इन्स्टिट्युटमध्ये जाण्यास प्रोत्साहन दिलं.

 

तमिळ फिल्म इंडस्ट्रीतले दिग्गज के. बालचंदर यांनी रजनीकांतला पहिल्यांदा १९७५ साली अपूर्व रांगंगलमध्ये संधी दिली. सुरवातीच्या काळात खलनायकाची भूमिका साकारणारा रजनीकांत नंतर महानायक झाला. रजनीकांत पहिल्यांदा १९७८ साली भैरवीमध्ये नायकाची भूमिका केली. रजनीकांतच्या अफलातून शैलीने तमिळ सिने षौकिनांना अक्षरश: वेड केलं. त्यानंतरच्या प्रत्येक सिनेमात रजनीकांतने आकाशाला गवसणी घातली. रजनीकांतने तमिळ फिल्म इंडस्ट्रीवर आणि तमिळ सिने षौकिनांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. एवढचं नव्हे तर जपानमध्येही रजनीकांतच्या सिनेमाला दाद मिळाली.

 

सामान्यतून असामान्यत्वाचा प्रवास साध्य करणाऱ्या आणि आयुष्यात सर्वोच्च पदावर पोहचून देखील पाय जमिनीवर घट्ट रोवून उभ राहणाऱ्या रजनीकांतला आपण फक्त हात जोडून प्रणाम करु शकतो.

 

Tags: