राजेश खन्ना यांना 'ट्विटर'वरून श्रद्धांजली

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया में, खूश रहना मेरे यार...

Updated: Jul 18, 2012, 04:49 PM IST

www.24taas.com,मुंबई

 

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

पंतप्रधान कार्यालय

सिनेमाक्षेत्रातील महान व्यक्तिमत्व, कलाकार आणि माजी खासदार श्री. राजेश खन्ना यांना पंतप्रधानांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी

आपल्या अनोख्या व्यक्तिमत्वाने राजेश खन्ना यांनी भारतीयांच्या हृदयात विशेष आणि अविस्मरणीय स्थान मिळवलं होतं. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

 

दिग्दर्शक कुणाल कोहली

सुपरस्टार हा शब्द सर्वप्रथम राजेश खन्ना यांच्यासाठी वापरला गेला. त्यांची स्टाइल, त्यांची अदा, त्यांचा चार्म, त्यांचं हास्य, त्यांची गाणी आणि त्यांच् हिट फिल्म्स. ते नेहहमीच जिवंत राहातील.

 

क्विझमास्टर डेरेक ओ’ब्रायन

मी त्यांच्यासाठी शाळा बुडवायचो. राजेश खन्ना यांच्या सिनेमांची ब्लॅकमध्ये ‘दो का चार’ तिकिट्स विकत घ्यायचो. तुम्ही सदैव आमच्या मनात राहाल.

 

करण जोहर

त्यांची जादू.. त्यांचे हावभाव.. भारतीय सिनेमाच्या इतिहासात राजेश खन्ना यांनी लावलेलं वेड नेहमीच उल्लेखलं जाईल.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!!!

 

स्मृती इराणी

गुड बाय सुपरस्टार. ईश्वर राजेश खन्ना च्या आत्म्याला शांती देवो.

 

प्रतिक बब्बर

झिंदगी का सफर.. है ये कैसा सफर.. कोई समझा नही- तुम्हाला कदाचित समजला होता.. राजेश खन्नासाहेब तुम्हाला श्रद्धांजली.. वर स्मितालाही जरूर भेटा.

 

 

कैलाश खेर

आमच्या वडिलांच्या पिढीतल सुपरस्टार या जगातून गेले. ते या जगाच्या पलिकडचे अभिनेते होते. ज्यांच्या नावावर कोट्य़ावधी लोकांनी आपल्या मुलांची नावं राजेश ठेवलं. राजेश नाव असणाऱ्यांनी आपल्या नावामागे खन्ना जोडलं. असा ज्यांचा करिश्मा होता. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

 

अली झफर

राजेश खन्ना- ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या सिनेमांच्या आणि गाण्यांच्या अनेक सुंदर आठवणी आहेत..

 

रायमा सेन

स्टारडम शब्दाची व्याख्या निर्माण करणाऱ्या राजेश खन्ना यांना शेवटचा सलाम.

 

दिव्या दत्ता

रुपेरी पडद्यावर प्रणयाची नवी परित्भाषा निर्माण करणाऱ्या भारतीय सिनेमातील सुपरस्टार राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमची खूप आठवण येत राहील काकाजी.

 

मधुर भांडारकर

काकाजी तुमच्यासारखा सुपरस्टार कधी झाला नव्हता आणि कधी होणारही नाही. तुमची खूप आठवण येत राहील.

 

सोनू सूद

राजेश खन्ना सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुदैवाने काही महिन्यांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात त्यांची भेट झाली होती. एकमेव सुपरस्टार

 

आर्शद वारसी

काका तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. देव सुमच्या आत्म्यास शांती देवो.

 

श्रेयस तळपदे

व्हीसीआरवर मी पाहिलेला पहिला चित्रपट ‘आराधना’ होता. झिंदगी कैसी है पहेली हाये... कभी  हसाये कभी . रुलाये. भावपूर्ण श्रद्धाजली प्रिय ‘आनंद’

 

फरहा खान

भारतातील पहिला सुपरस्टार आज आपल्यात नसल्याची अत्यंत दुःखद बातमी कळाली. पण राजेश खन्ना हे मिथक त्यांच्या सिनेमांमधून कायम अमर राहील.

 

तुषार कपूर

राजेश खन्नाजी, आपले पहिले सुपरस्टार आज आपल्यातून गेले. ‘क्या दिल ने कहा’ या सिनेमात मी त्यांच्यासोबत काम केलं होतं आणि त्यांच्याशी केवळ बोलण्यातूनही खूप काही शिकलो होतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

 

नेहा धुपिया

राजेश खन्ना सहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.. तुम्ही , तुमचं स्टारडम, तुमची जादू सदैव आमच्याबरोबर राहील.

 

केन घोष

राजेश खन्नांना भावपूर्ण श्रद्धांजली- “नफरत की दुनिया को छोड के प्यार की दुनिया में, खूश रहना मेरे यार...” हाथी मेरे साथी

 

दिया मिर्झा

बाबूमोशाय एतो भालो भाषा भालो ना.. आ