हॉट आणि थ्रिलिंग 'राज-३'

विक्रम भट्ट याच्या ‘राज-२’चा फर्स्ट लूक लोकांसमोर आला आहे. अणि पहिल्या लूकवरून तरी सिनेमा चांगलाच सस्पेंस थ्रिलर वाटतोय. या सिनेमात काय असेल, याचीही उत्कंठा वाढीस लागते.

Updated: Aug 1, 2012, 11:13 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

विक्रम भट्ट याच्या ‘राज-२’चा फर्स्ट लूक लोकांसमोर आला आहे. अणि पहिल्या लूकवरून तरी सिनेमा चांगलाच सस्पेंस थ्रिलर वाटतोय. या सिनेमात काय असेल, याचीही उत्कंठा वाढीस लागते. या सिनेमात इमरान हाश्मी, बिपाशा बासू आणि इशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची कथा का दिग्दर्शकाभोवती फिरते. ज्या दिग्दर्शकाचे दोन अभिनेत्रींशी संबंध आहेत.

 

बिपाशा बासू इमरान हाश्मीच्या प्रेमात वेडी होऊन त्याला मिळवण्यासाठी इशा गुप्ताला आपल्या मार्गातून काढण्याचा प्रयत्न करत असावी, असं ट्रेलरवरून दिसतंय. सिनेमाला दिलेले साऊंड इफेक्ट्सही एकदम गूढतेची झाक असणारे वाटत आहेत.

 

सिनेमातील बरेचसे सीन्स उद्दिपीत करणारे वाटत आहेत आणिअशा गुप्ता तसंच बिपाशा दोन्ही अभिनेत्रींना पाहाणं ही मेजवानीच असेल. असा पहिला लूक जरी खूपच प्रेक्षणीय वाटत असला, तरी सिनेमा कसा असेल हे आत्ताच सांगणं कठीण हे. मात्र राज-३च्या निमित्ताने काळी जादू आणि पुन्हा एक थ्रिलर पाहायला नक्की मिळेल.