राज कंवर यांना शेखर कपूरांची श्रध्दांजली

शेखर कपूर यांनी ख्यातनाम दिग्दर्शक राज कंवर यांना श्रध्दांजली वाहली आहे. निर्माता-दिग्दर्शक राज कंवर यांचे शुक्रवारी किडनीच्या विकाराने सिंगापूर इथे निधन झालं. सिनेमाचं वेडं असलेला मुलगा असा राज कंवर विषयीच्या आठवणीला उजाळा शेखर कपूर यांनी दिला.

Updated: Feb 6, 2012, 11:43 AM IST

www.24taas.com,मुंबई 

 

शेखर कपूर यांनी ख्यातनाम दिग्दर्शक राज कंवर यांना श्रध्दांजली वाहली आहे. निर्माता-दिग्दर्शक राज कंवर यांचे शुक्रवारी किडनीच्या विकाराने सिंगापूर इथे निधन झालं. सिनेमाचं वेडं असलेला मुलगा असा राज कंवर विषयीच्या आठवणीला उजाळा शेखर कपूर यांनी दिला.

 

राज कंवर यांनी माझे सहाय्यक म्हणून पहिल्यांदा काम केलं आणि नंतर अनेक यशस्वी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केल्याचं कपूर यांनी ट्विट केलं आहे. राज कंवर यांनी शाहरुख खानला 'दिवाना' या सिनेमात तर प्रियांका चोप्राला 'अंदाज'मध्ये पहिल्यांदा संधी दिली. कंवर यांनी 'जुदाई', 'जीत', 'बादल' आणि 'लाडला' या हिट सिनेमांचे दिग्दर्शन केलं. रिषी कपूर, हेमा मालिनी आणि रेखा यांची भूमिका असलेला सदियाँ हा त्यांचा अखेरचा सिनेमा.

 

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या १९८४ साली झालेल्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत राज कंवर यांच्या कुटुंबातील १५ लोकांचा बळी गेला होता त्यादिवशी मी त्यांच्या सोबत होतो आणि आज त्यांच्या अंत्ययात्रेला आलो असं कूपर यांनी ट्विटरच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे.