‘अॅक्शन बंद...’ सल्लूला डॉक्टरांचा सल्ला

अभिनेता सलमान खानची प्रकृती पुन्हा नाजूक अवस्थेत आहे. डॉक्टरांनी त्याला अॅक्शनपट करण्यास मनाई केली आहे.

Updated: Jun 26, 2012, 12:17 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

अभिनेता सलमान खानची प्रकृती पुन्हा नाजूक अवस्थेत आहे. डॉक्टरांनी त्याला अॅक्शनपट करण्यास मनाई केली आहे.

 

स्नायुंचं दुखणं जडावलेल्या सलमाननं छोटीसुद्धा ढुशूम-ढुशूम करण्याची रिस्क घेऊ नये, त्याचा प्रकृतीवर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी सल्लूला दिलाय. ट्राईजेमिनल न्यूरोलॉजियानं वैतागलेल्या सलमानच्या चेहऱ्यावरही या आजाराचा परिणाम दिसू शकतो.

 

गाल आणि जबड्याच्या आजारानं आधीच त्रस्त असलेल्या सलमाननं याआधीही एकदा ऑपरेशन केलं होतं. पण, हा आजार मात्र पूर्ण बरा झाली नाही आणि आता तो पुन्हा उदभवला. अॅक्शन सीन देताना ढुश्शूम-ढुश्शूमबरोबरच वेगवेगळे अनेक स्टंटस् करावे लागतात. यावेळी थोडीशीही चूक झाली आणि एखादा जोरदार पंच सलमानच्या चेहऱ्यावर बसला तर त्याचे वाईट परिणाम लगेचच त्याच्या चेहऱ्यावर दिसून येऊ शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

 

पण, डॉक्टरांच्या या सल्ल्यामुळे सलमान सध्या करत असलेल्या सिनेमांचा शूटींग मात्र धोक्यात आलंय. त्याचे ‘किक’ आणि ‘शेरखान’ या सिनेमांचं शूटही लवकरच सुरू होणार आहे आणि या दोन्ही चित्रपटांत  अनेक अॅक्शन सीन्स आहेत. त्यामुळे आता काय? असा प्रश्न या सिनेमांच्या निर्मात्यांना पडलाय. ‘दबंग’ या सिनेमाचा सिक्वेल ‘दबंग – २’ या अॅक्शनपटातही सलमानच्या डुप्लिकेटचा जास्तीत जास्त वापर केला जातोय.

 

बऱ्याच प्रयत्नानंतर सलमान डुप्लिकेट वापरण्यासाठी राजी झालाय. असंही म्हटलं जातंय की, या स्टंट सीन्ससाठी सोहेल खान आणि साजिद नाडियाडवाला यांनी लॉस एंजेलिस आणि हाँगकाँगवरून मोठमोठे स्टंट दिग्दर्शक आणि सलमानच्या डुप्लिकेटला बोलावलंय.

 

.