२५ ऑगस्टला संपणार 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'

झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या लोकप्रिय मालिकेचा शेवटचा भाग २५ ऑगस्टला प्रसारित होणार आहे. या मालिकेतील स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी खूप लोकप्रिय ठरली. मात्र याचा शेवट काय होणार आहे, हे अजून गुलदस्त्यात आहे.

Updated: Aug 8, 2012, 08:43 AM IST

www.24taas.com, मुंबई

झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या लोकप्रिय मालिकेचा  शेवटचा भाग २५ ऑगस्टला प्रसारित होणार आहे. या मालिकेतील स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी खूप लोकप्रिय ठरली.  मात्र याचा शेवट काय होणार आहे, हे अजून गुलदस्त्यात आहे.

राधा घनाच्या दुस-या गोष्टीचं सत्य हळू हळू घरात समजलंय. त्याचे पडसादही उमटायला लागलेत. माई आणि दिगंबर याच चिंतेत आहे. तर दुसरीकडे वल्लभकडे पैशांची मागणी नक्की कोणी केलीय त्याचाही छडा लागत नाहीये. राधा घनाच्या दुस-या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेल्या वल्लभ फोन येतो आणि त्याचा नूरच पालटतो. वल्लभकडे कुणीतर दहा लाखांची मागमी करतंय हे ज्ञानाला लक्षात येतं.  ज्ञाना प्रभातला भेटतो आणि त्याला समजतं हे असं... आता प्रभातनेच 10 लाख रुपयांची मागणी वल्लभकडे केलीय असा समज ज्ञानाचा होतो.

दुसरीकडे घना-राधाच्या  लग्नाची दुसरी गोष्ट कधी संपणार हे दिग्या माईंना विचारतो त्यावर माई त्याला धीर धरायला सांगतात. घनाराधानं केलेल्या फसवणुकीमुळे दिग्याही दुखावला गेलाय. घना राधा हे नाटक किती दिवस करणार असाच  प्रश्न त्यालाही पडलाय... देवकी माईंना राधाच्या मंगळगौरीबद्दल विचारते तेव्हा ही माई त्यात काही रस घेत नाहीत.. माईंच नक्की काय बिनसलंय हे देवकीलाही कळत नाही.. आता राधाच्या मंगळागौरीनंतर तरी देवकीला सगळ्याचा उलगडा होतो