उस्मानबादमध्ये कोण दाखवणारं 'आस्मान'?

उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चुरस आहे. काँग्रेस-शिवसेनेनं छुपी युती केल्यानं खासदार डॉ. पद्मसिंह पाटलांसमोर तगडं आव्हान निर्माण झालं आहे.

Updated: Feb 7, 2012, 12:56 PM IST

www.24taas.com, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चुरस आहे. काँग्रेस-शिवसेनेनं छुपी युती केल्यानं खासदार डॉ. पद्मसिंह पाटलांसमोर तगडं आव्हान निर्माण झालं आहे.

गेल्या वर्षभरातली बदललेल्या राजकीय समीकरणामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीच्या विरोधातली मतांची विभागणी टाळण्यासाठी काँग्रेस-युतीने छुपी युती केल्यानं खासदार पद्मसिंह पाटलांसमोर तगडं आव्हान निर्माण झाल आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ.पद्मसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार ओम राजे निंबाळकर यांच्यातील कट्टर हाडवैरामुळे निवडणुकीच्या प्रचारातील जनतेच्या विकासाचे मुद्दे बाजूला पडले होते. याचाच फायदा घेत पालकमंत्री मधुकरराव चव्हाणांनी जिल्ह्यात काँग्रेसची ताकज वाढवायचा प्रयत्न केला आहे. आता जिल्हा परिषदेत त्याचा कुणाला लाभ होणार ते पहायचं आहे.