ऊस कामगार मतदानापासूनच दूरच !

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 4, 2012, 04:17 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर

 

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. पदरचे पैसे खर्च करून केवळ मतदानासाठी गावी परतायची त्यांची तयारी नसते. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

 

निवडणूका आल्या आणि गेल्या तरी ऊस कामगारांच्या जीवनमानात काहीच फरक आजपर्यंत तरी पडलेला नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असतो तो पोटाची खळगी भरण्याचा. सध्या सुमारे दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी काम करत आहेत. हे लक्षात घ्या.  मात्र हाती असलेलं काम सोडून, पदरचे पैसे खर्च करून केवळ मतदानासाठी आपल्या गावी परतणं त्यांना परवडत नाहीये. निवडणूकांच्या धामधूमीत अजून त्यांच्याकडे कुणी फिरकलंही नाही. एखाद्या उमेदवाराचं नशीब बदलवू शकणारे हे कामगार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

 

बीड, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यातून हे कामगार आलेले आहेत. निवडणुकीबाबत उदासीन असलेले कामगार मतदानासाठी रोजगार बुडवणार नाहीत हे नक्की. त्यामुळे उमेदवार त्यांना घेऊन जाण्यासाठी काय शक्कल लढवतात ते पहावं लागेल.