अमेरिकेत दाऊदच्या साथीदारांना बंदी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्यावर अमेरिकेनं बंदी घातलीये. छोटा शकील आणि टायगर मेमन अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळं ही बंदी लादण्यात आलीये.

Updated: May 16, 2012, 05:42 PM IST

www.24taas.com

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्यावर अमेरिकेनं बंदी घातलीये. छोटा शकील आणि टायगर मेमन अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळं ही बंदी लादण्यात आलीये.

बंदीमुळं दाऊद आणि त्यांच्या साथीदारांना अमेरिकेत आर्थिक व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आलाय. दाऊद आणि त्याच्या साथीदारांनी अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं अमेरिका आणि लॅटीन अमेरिकी देशांपर्यंत पोहचवलयं. अमेरिकेनं दाऊदच्या साथीदारांवर बंदी घालून त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केलाय.

दरम्यान, भारतानंही दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी कडक पाऊल उचलण्याचं ठरवलंय. दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे भारताकडं असल्याचं गृह सचिव आर के सिंह यांनी सांगितलं असून पाकिस्तानबरोबरच्या चर्चेत हा मुद्दा उठवणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई हल्ल्यातील आरोपी हाफिज सईद याच्याबाबतही पाकबरोबर चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.