अलाहबादमध्ये नौकाडुबी, दोन भाविकांना जलसमाधी

अलाहबाद येथे संगमावर भाविकांना वाहून नेत असलेली होडी बुडून महाराष्ट्रातील २ भाविकांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या वेळेस या नौकेतून १४ भाविक संगमामध्ये डुबकी घेण्यासाठी निघाले होते. हे सर्व भाविक महाराष्ट्रातील होते.

Updated: Mar 17, 2012, 10:44 AM IST

www.24taas.com, अलाहबाद

 

अलाहबाद येथे संगमावर भाविकांना वाहून नेत असलेली होडी बुडून महाराष्ट्रातील २ भाविकांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या वेळेस या नौकेतून १४ भाविक संगमामध्ये डुबकी घेण्यासाठी निघाले होते. हे सर्व भाविक महाराष्ट्रातील होते. असं येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

ही नाव पाण्यात मध्यभागी पोहोचल्यावर अचानक उलटली. यामुळे नावेतील सर्व प्रवासी खोल पाण्यात पडले. येथील व्यावसायिक स्कूबा डायव्हर्सनी या सर्व भाविकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तरीही एका व्यक्तीला शोधण्यात त्यांना अपयश आलं आणि त्या व्यक्तीस जलसमाधी घडली. तर दुसऱ्या भाविकाचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये नेत असताना झाला.

 

संगमावर डुबकी घेणं हे हिंदू धर्मियांमध्ये पवित्र मानलं जातं. यामुळे सर्व पापांचं क्षालन होतं असं मानलं जातं. याचसाठी १४ भाविक संगमावर गंगास्नान करण्यासाठी निघाले होते. मात्र, दुर्दैवाने ही नाव उलटल्याने यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.