उत्तर भारताला भूकंपाचा हादरा

उत्तर भारतातील अनेक राज्य भूकंपाच्या धक्क्याने हदरले आहेत. दिल्लीजवळील गाझीयाबाद, नोएडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. ५.८ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता मोजली गेली.

Updated: Jul 12, 2012, 08:33 PM IST


www.24taas.com, नवी दिल्ली

 

उत्तर भारतातील अनेक राज्य भूकंपाच्या धक्क्याने हदरलीत आहेत.  दिल्लीजवळील गाझीयाबाद, नोएडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले.  ५.८ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता मोजली गेली.

 

भूकंपाचे केंद्र अफगानिस्तानमधील हिंदुकुश जवळ १९० किलोमीटर परिसात होता.  दिल्ली शिवाय जम्मू-कश्मीर आणि चंदीगढमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्रथम जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, जयपूर आदी ठिकाणी कंप झाल्याचे वृत्त आहे.